मुरबाड – मुरबाड शहरातली मुख्य बाजारपेठ रस्त्या लगत पादचाऱ्यांसाठी फूटपाथ बनवून सात वर्ष झाली मात्र वारंवार नागरिकांनी तक्रारी करून देखील नगरपंचायतला फूटपाथ मोकळे करण्यात अपयश आल्याने आम्ही कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न नागरिक उपास्थित करत आहेत
नागरिकांच्या मागणीला होकारात्मक उत्तर देत नगरपंचायत प्रशाशन कधीतरी थातुर मातुर करवाई करते, मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. ३ महिन्यापूर्वी आर पी आय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास देसले यांनी याबाबत आंदोलनं छेडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रभारी अधिकारी कामकाज पाहत असल्याने मुख्याधिकारी हजर झाल्यावर यावर करवाई होइल असे पत्र देण्यात आले. मात्र गेलीं दोन महिने मुख्याधिकारी म्हसे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरही कुठलीच करवाई होत नसल्याने कैलास देसले यांच्या आंदोलनाच्या बंडाला थंड केल्याचा आरोप नागरिक करत आहे.
विद्यमान नगराध्यक्ष व तत्कालिन शिवसेना शहर प्रमूख राम दुधाळे यानी हि याबाबत अनेक आंदोलने केली. मात्र आता नगराध्यक्ष असतानाही ते फूटपाथ मोकळा करण्यात अपयशी ठरले आहेत.