मुरबाड – मुरबाड शहराजवळील डोळ्याचापाडा येथे काल दिनांक 15 फेब्रु दुपारी दोनच्या सुमारास चेतन बांगर यांच्या घरात घुसून साजई गावातील भरत हरड या तरुणाने चेतन बांगर याची पत्नी चंदना बांगर मुलगी श्रावणी बांगर ह्यांच्या वर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पन्नालाल यादव हा ही जखमी झाला. आरोपी फरार आहे.
जखमींना उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना तात्काळ उल्हासनगर येथील रुग्णालयात नेले आसता उपचाराअंती चंदना हिचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मुकेश विशे यांनी मुरबाड पोलिसांना कळवली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरबाड पोलिस आरोपी भरत हरड याचा शोध घेत आहेत. हा आरोपी नेहमी बांगर यांच्या घरी यायचा अशी माहिती समोर आली आहे. मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी आरोपी लवकरच हाती लागेल असे सांगितले.