नागपूर:- लहान मुलांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाले आहे. एका आठ महिन्याच्या मुलाच्या अपहरणानंतर नागपूर पोलिसांच्या तपासात आतापर्यंत सात मुलांच्या अपहरण आणि विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तीन प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. बाळ अपहरण आणि विक्री प्रकरणी आंतरराज्यस्तरीय टोळी सक्रिय असल्याचे पुढे आले आहे. नागपुरात लहान मुलांचे अपहरण करुन त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहे.