शिलॉंग – मेघालय राज्यातील विरोधी कॉंग्रेस पक्षाने नुकताच आपला ‘फाईव्ह स्टार मेघालय ‘ बनविण्याचे आश्वासन देत आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला. यात मोफत वीज आणि आरोग्य सुविधा करून देण्यासह शेतकर्यांच्या ठराविक शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली.
मेघालय राज्यात २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, सांस्कृतिक आणि स्वतंत्र ओळख असलेल्या मेघालय राज्यासाठी भाजप हा मोठा धोका आहे.तसेच एनपीपी, युडीपी आणि टीएमसी हे राजकीय पक्ष भाजपच्या हातातील कठपुतळी आहेत. काल शनिवारी प्रकाशित केलेल्या या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने दारिद्र्य रेषेखालील रेषेखाली कुटुंबाला मोफत वीज पुरवठा,मोफत आरोग्य सुविधा,मोफत घर,गॅस सिलिंडर आणि मुलींना बारावी पर्यंत मोफत शिक्षण देणार असल्याचे म्हटले आहे.तसेच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळालीच पाहिजे यासाठी कॉँग्रेस सत्तेवर आल्यानंतर प्रयत्न करणार आहे.त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्या माध्यमातील पत्रकारांना पेन्शन योजना आणि महिलांसाठी स्वतंत्र बाजारपेठ सुरू करण्याचे आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.