शिलॉंग-मेघालयमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३.४६ वाजता राज्यातील तुरापासून ३७ किमी पूर्व-ईशान्य दिशेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदली गेली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती.काल महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेशातील बसर पासून ५८ किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.त्याची रिश्टर
स्केल तीव्रता ३.८ इतकी नोंदली गेली.तसेच महाराष्ट्रातील नाशकातील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले होते.रिश्टर स्केलवर याची तीव्रता ३.६ इतकी मोजण्यात आली होती.या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या पश्चिमेला ८८९ किमी असून तो जमिनीपासून ५ किमी खोलीवर होते.या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.