संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

‘मेट्रो 3’चा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरु होणार?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3चे काम युद्धीपातळीवर सुरु ठेवले असून या मार्गिकेचे 79 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे बीकेसी या पहिल्या टप्प्याचे 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिला टप्पा डिसेंबर 2023 सुरु होण्याची शक्यता आहे. तर बीकेसी कफ परेड दुसऱ्या टप्प्याचे 75.6 टक्के काम पूर्ण झाले आहे.
एमएमआरसीने ‘मेट्रो 3`च्या 31 जानेवारी 2023 पर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला. आढाव्यातून एकूण प्रकल्पाचे 79 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचे दोन टप्प्यांत काम सुरू आहे. आरे बीकेसी पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू करण्याचा मानस एमएमआरसीचा आहे. त्यामुळे या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत या टप्प्याचे 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाच्या आढाव्याच्या अहवालानुसार एकूण प्रकल्पाचे 90.6 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सिस्टीमचे 46.1 टक्के, रुळाचे 53.8 टक्के, स्थानकांचे 88.3 टक्के काम पूर्ण झाले आहे. यापूर्वीच भूयारीकरणाचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे बीकेसी या पहिल्या टप्प्याचे एकूण 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर स्थानक आणि बोगद्याचे 97.1 टक्के, सिस्टीमचे 59.1 टक्के, तर रुळाचे 70.6 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बीकेसी कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचे एकूण 75.6 टक्के काम मार्गी लागले आहे. यातील मेट्रो स्थानक आणि बोगद्याचे 94.5 टक्के, रुळाचे 44.2 टक्के आणि सिस्टीमचे 39.6 टक्के काम पूर्ण झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या