संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

मेस्सी निवृत्तीच्या वाटेवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दिल्ली – अर्जेन्टिनाला यंदाचा वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार लियोनील मेस्सी आता निवृत्तीचा विचार करीत असल्याचे समजते.
मेस्सी म्हणाला, ‘मी माझ्या कारकिर्दीत सर्व काही मिळवलं आहे. माझ्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा हा एक अनोखा मार्ग होता. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत हे सगळं घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. विशेषतः हा क्षण जगणं) अप्रतिम होतं. आम्ही कोपा अमेरिका जिंकली आणि त्यानंतर विश्वचषकही जिंकला. आता काहीच शिल्लक नाही.’त्यामुळे निवृत्ती घ्यायला हरकत नाही असे त्याने म्हटलेय

मेस्सीला त्याच्या देशाचा माजी दिग्गज माजी फुटबॉलर डिएगो मॅराडोना आवडत होता. मॅराडोनालाही मेस्सी आवडत होता. मॅराडोना यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. या दिग्गज खेळाडूची आठवण करून देताना मेस्सी म्हणाला, ‘मला डिएगो मॅराडोनाकडून विश्वचषकाची ट्रॉफी घ्यायला आवडली असती किंवा किमान ते हा क्षण बघू शकले असते.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या