लखनऊ – मैनपुरी लोकसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने उमेदवार घोषित केला असून माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टींचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.
दिवंगत मुलायम सिंह यादवांच्या निधन झाल्याने या मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात यादव कुटुंबाचे गेल्या काही दशकांपासून वर्चस्व आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत डिंपल यांनी कन्नौलमधून निवडणूक लढवली होती. तेथून त्यांनी जिंकल्याही होत्या. मात्र त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांना भाजपच्या सुब्रत पाठक यांनी 10 हजार मताधिक्कांच्या अंतराने हरवले होते. त्यानंतर आता डिंपल पुन्हा या मैनपुरातून आपले नशीब आजमावणार आहे.