संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

मॉड्रेनाच्या एचआयव्ही लसीसाठी मानवी क्लिनिकल चाचण्या सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क – कोविडवर लस निर्मित करणाऱ्या मॉड्रेना या कंपनीने आता एचआयव्ही लसीसाठी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. कोविड-19 लसीप्रमाणे पेशींना विषाणूशी लढण्यासाठी एम आरएनए तंत्रज्ञान वापर करून एचआयव्हीवर लस निर्मित केली जात आहे. या प्रायोगिक एचआयव्ही लसीसाठी मानवी क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत.

वॉशिंग्टन, डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सेस येथे नुकतेच पहिले लसीकरण करण्यात आले, असे वृत्त आहे. ही लस पांढर्‍या रक्त पेशींना एचआयव्ही निष्प्रभावी करू शकणार्‍या अँटीबॉडीजमध्ये बदलण्यास प्रवृत्त करण्यासाठी डिझाइन केली आहे. एचआयव्ही लसीसह काम करण्यासाठी बूस्टर शॉटचा देखील अभ्यास केला जात आहे.

गेल्या चार दशकांपासून (एचआयव्ही)विरुद्ध शास्त्रज्ञ लस विकसित करू शकले नाहीत, उपचारांमध्ये प्रगती केली असली तरी एचआयव्हीमुळे होणारा एड्स प्राणघातक ठरू शकतो. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की 56 निरोगी एचआयव्ही-निगेटिव्ह प्रौढ क्लिनिकल चाचणीमध्ये भाग घेत आहेत. 48 जणांना लसीचे एक किंवा दोन डोस मिळत आहेत आणि 32 बूस्टर देखील घेत आहेत. आठ लोकांना फक्त बूस्टर मिळेल. या सर्वांवर अंतिम डोस मिळाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत त्यांचे निरीक्षण केले जाईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami