न्यूयॉर्क – मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या कर्मचार्यांपैकी सुमारे 2% म्हणजे सुमारे 1,600 कर्मचार्यांची कपात केली आहे. कंपनीच्या मॉर्गन स्टॅन्ली जगभरात माफक प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात करत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स गोरमन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. बँकेचे जगभरात 81,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
मॉर्गन स्टॅनलीचे मुख्य कार्यकारी जेम्स गोरमन यांनी गेल्या आठवड्यात टाळेबंदीचे संकेत दिले होते जेव्हा त्यांनी रॉयटर्सला सांगितले की काही लोकांना कामावरून कमी करण्यात येईल. आम्ही जगभरात काही माफक कपात करत आहोत.या इन्व्हेस्टमेंट बँकेच्या आधी, मेटा, अॅमेझॉन, ट्विटर, सीएनएन, स्नॅप सारख्या अनेक जागतिक कंपन्यांनी आधीच मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. न्यूयॉर्कस्थित पेप्सिकोने आपल्या उत्तर अमेरिकन स्नॅक्स आणि पेय विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.