संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

मोदीजी माफी मागो; काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसेच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने कोरोनाचा प्रसार झाला, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. याविरोधात आता महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून आज राज्यभरात भाजपाच्या कार्यालयासमोर ‘मोदीजी माफी मागा’ आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या नरिमन पॉईंट येथील पक्ष कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंत्रालया जवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली.

दरम्यान, आज सकाळी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. परळीत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. औरंगाबादमध्येही शहर काँग्रेसच्या वतीने मुकुंदवाडी परिसरात आज बुधवारी आंदोलन करण्यात आले. येवल्यामध्येदेखील मुकुंदवाडीतील शिवाजी पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधानां विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यानी हातात काठ्या घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचे काम केले. त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, असेही पटोले म्हणाले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर भाजपच्या कार्यालयावर मोर्चा आणला तर भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ठोकून काढतील, असा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिला आहे. अनिल बोंडे यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे हा इशारा दिला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami