संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मोपा विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षा रक्षकच नोकरी का ?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आ.जीत आरोलकर यांचा सवाल

पणजी – गोव्यातील पेडणे तालुक्यातील मोपा येथे देशातील १३ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे.मात्र या विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना याठिकाणी केवळ सुरक्षा रक्षकाचीच नोकरी देण्याचा प्रयत्न होत आहे.त्यांना अन्य विभागात नोकऱ्या दिल्या जात नसल्याने मांद्रे विधानसभेचे आमदार जीत आरोलकर यांनी यावर आक्षेप घेत या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना फक्त सुरक्षा रक्षकाचीच नोकरी का दिली जात आहे असा सवाल विमानतळ प्राधिकरणाला केला आहे. आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमदार जीत आरोलकर हे बोलत होते. यावेळी आमदार आरोलकर पुढे म्हणाले की,या विमानतळासाठी परिसरातील शेतकऱ्यांची सुमारे एक कोटींपेक्षा जास्त चौरस मीटर जमीन गेली आहे.या पीडित शेतकऱ्यांना नोकऱ्या देण्याचा प्रस्ताव आहे.मात्र केवळ सुरक्षा रक्षक म्हणूनच या शेतकऱ्यांना नोकरी का देताय ? त्यांना सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळण्याचा अधिकार असल्याचे आमदार आरोलकर यांनी सांगितले. यावेळी प्रारंभी प्रा.विठोबा बगळी यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास मोरजी जि.प.सदस्य सतीश शेट गावकर,सातेरी देवस्थानचे सचिव सज्जन बगळी,नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष राजेश नागवेकर आगरवाडा सरपंच अन्थनी फर्नांडीस,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी काही मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami