संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

मोफत साडी वाटप कार्यक्रमात चेंगराचेंगरी! ४ महिलांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चेन्नई- तामिळनाडूमधील तिरुपत्तूर जिल्ह्यामधील वन्नियामबाडी येथे काल शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला.मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत ४ वयस्कर महिलांचा मृत्यू झाला तर ११ महिला जखमी झाल्या. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी २ लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे.

‘थोईपूसम’ उत्सवाच्या आधी अयप्पन नावाच्या व्यक्तीने मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात महिलाांनी गर्दी केली होती. टोकन घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती.याचवेळेस अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी जखमी महिलांना रुग्णालयामध्ये दाखल केले.तर मरण पावलेल्या महिलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. दरम्यान,तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी मरण पावलेल्या महिलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.थाईपूसम हा हिंदू तमिळ समुदायाकडून थाई या तमिळ महिन्यामधील पोर्णिमेच्या दिवशी ‘थोईपूसम’ उत्सव साजरा केला जातो.या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने मोफत साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती असे सांगितले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या