संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोदा पटेल यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द केल्याने या अधिका-यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. 

खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यासह नऊजणांकडून डेलकर यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांच्या मुलाने पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पटेल यांच्यासह नऊ जणांवर डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे राज्य सरकारने गेल्या वर्षी म्हटले होते.त्याविरोधात पटेल यांच्यासह नऊजणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी  यांच्या खंडपीठाने गुरुवारी या याचिकांवर निर्णय दिला. पटेल यांच्यासह जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलीस अधीक्षक, उप जिल्हाधिकारी यांचवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून मुंबई हायकोर्टाकडून गुन्हा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधी कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर आरोप करण्यात आले असे स्पष्ट निष्कर्ष हायकोर्टाने काढला आहे.त्यामुळे मुंबई पोलिसांनी कोणाच्यातरी दबावाखाली येऊन हा गुन्हा नोंदवला का ? असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने उपस्थित केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami