मुंबई – आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या कंपनीने तब्बल 52 कोटींचे कर्ज बुजवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
2011 ते 2015 या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु, हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले होते. त्यामुळे मोहित कंबोज आणि दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते. मुंबई सत्र न्यायालयाने मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन (लरळश्र) मंजूर केला आहे.