संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

म्हाडाकडून मुंबई उपनगरातील ९ एकरावरील अतिक्रमण उध्वस्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास व मंडळांतर्गत कार्यरत अतिक्रमण निर्मूलन विभागाने गेल्या २ महिन्यांत राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत बृहन्मुंबई क्षेत्रातील १६ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. तसेच चार भूखंडांवरील अतिक्रमण हटविण्यात आले. सदर मोहिमेत सुमारे ९ ते १० एकर म्हाडाच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात यश आले असून या मोहिमेत मालवणी मालाड परिसरातील भाब्रेकर नगर येथे असणाऱ्या सात एकर भूखंडावरील १५० अनधिकृत झोपड्या हटविण्याच्या सर्वात मोठ्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईचाही समावेश आहे.

मागील दोन महिन्यात राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गोरेगावमधील सिद्धार्थ नगर, मोतीलाल नगर, मालवणी मालाड, दिंडोशी मालाड पूर्व, सांताक्रूझ पूर्व, कोले कल्याण, एसव्हीपी नगर वर्सोवा-अंधेरी पश्चिम, टागोर नगर -विक्रोळी, आकुर्ली म्हाडा वसाहत कांदिवली पूर्व, आनंद नगर सांताक्रूझ पूर्व या भागातील म्हाडाच्या भूखंडांवरील अतिक्रमण काढण्यात आले असून अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत.

म्हाडला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमआरटीपी ऍक्ट १९६६ च्या प्रकरण चार कलम ४३ ते ५८ मधील म्हाडा जमिनीवरील विनापरवाना बांधकाम पाडण्याचा अधिकार शासनाने दिले आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामासाठी परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंताना दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या