म्हैसूर – कर्नाटकातील म्हैसूर उटी रोडवरील एका बसस्थानकाचे रंग- रूप भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर बदलण्यात आले.यापूर्वी या बसस्थानकावर तीन घुमट होते.ते मशिदीसारखी दिसत असल्याचा आरोप एका भाजप नेत्याने केला. ते दुरुस्त न केल्यास बसस्थानक बुलडोझरने पाडू, असा इशारा भाजपा खासदाराने दिला होता.त्यानंतर बसस्थानकाचे स्वरूप व रंग बदलण्यात आले आणि आता त्यावर फक्त लाल रंगाचा एकच घुमट दिसते .
गेल्या रविवारी कर्नाटकचे भाजप खासदार प्रताप सिम्हा म्हैसूरमध्ये ‘टिपू निजाकनसुगालू’ नावाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते.त्यावेळी त्यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला.एक बसस्टॉप दुरून मशिदीसारखा दिसत असून तो बुलडोझरने पाडण्याचा इशारा दिला. प्रताप सिम्हा म्हणाले की, सोशल मीडियावर हा बस स्टॉप पाहिला होता. यात 3 घुमट आहेत. मध्यभागी मोठा आणि बाजूंना लहान. मी अभियंत्यांना तीन-चार दिवसांत बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. त्यांनी असे केले नाही तर मी जेसीबी आणून स्वतः तोडून टाकीन.त्यानंतर आता त्या बस थांब्याचा कायापालट करण्यात आला आहे.