कंपनीच्या उत्पन्नाचा काही भाग तिच्या भागधारकांमध्ये वाटला जातो, त्याला डिविडंड्स म्हणतात. डिविडंडला अतिरिक्त उत्पन्न असेही म्हणतात कारण ते शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे होणाऱ्या नफ्यापासून वेगळे असते. भागधारकांना किती डिविडंड मिळेल हे कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे ठरवले जाते. आज आपण असे स्टॉक्स पाहूया जे नजीकच्या काळात डिविडंड देणार आहेत. परंतु लक्षात घ्या कोणताही शेअर खरेदी करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणता शेअर खरेदी करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
NMDC या सरकारी कंपनीने प्रति शेअर 5.73 रुपये डिविडंड जाहीर केला आहे. 18 फेब्रुवारी रोजी ज्या शेअरधारकांच्या डिमॅट खात्यांमध्ये हे शेअर्स असतील त्यांना हा डिविडंड मिळेल. हा डिविडंड 25 फेब्रुवारीला किंवा त्यानंतर शेअरधारकांच्या खात्यात येईल. गुरुवारी हा शेअर 159.3 रुपयांवर बंद झाला.
अल्केम लॅबोरेटरिज ही कंपनी जेनेरिक आणि स्पेशॅलिटी फार्मासाठी ओळखली जाते. ही मिड कॅप फार्मा कंपनी यंदा डिविडंड देणार आहे. कंपनीच्या 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत प्रति शेअर 30 रुपये डिविडंड देण्याची घोषणा करण्यात आली. 10 फेब्रुवारीला हा शेअर 3,500 रुपयांवर बंद झाला आहे.
CAMS या कंपनीच्या बोर्डाने कंपनी तिच्या भागधारकांना प्रति शेअर 10.75 रुपये डिविडंड देईल, असे जाहीर केले आहे. ही कंपनी वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना सेवा पुरवते.