संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

यशवंत जाधवांच्या घरातून IT अधिकारी निघाले; मॅरेथॉन चौकशी आज संपली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाकडून सुरू झालेली मॅरेथॉन चौकशी अखेर आज संपली. तब्बल चार दिवसांनंतर आज सकाळी या चौकशीला ब्रेक लागला. शुक्रवार सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. या चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्र, डिजिटल साधने (स्कॅनर, लॅपटॉप, हार्ड डिस्क) ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. आज सोमवारी, चौथ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास आयकर विभागाचे सर्व अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरातून बाहेर पडले. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरात ही चौकशी सुरू होती.

यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. तर, जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत. यशवंत जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचे बोलले जात आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी ईडी-आयकर विभागाकडे तक्रार केल्यानंतर यशवंत जाधव यांना आयकर विभागाने नोटीस बजावली होती. मात्र तिला समाधानकारक उत्तर न दिल्याने यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाचे अधिकारी सीआरपीएफ जवानांसह यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी सकाळीच दाखल झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami