संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

यात्रेकरूंची बस कोसळून 22 ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उत्तरकाशी-मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंवर रस्त्यातच काळाने घाला घातला. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील उत्तरकाशीमधील दामटा गावाजवळ यात्रेकरूंची बस 400 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 22 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती उत्तराखंड प्रशासनाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थली धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना उत्तर काशीच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान, गृहमंत्री आदींनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami