मुंबई – यापुढे कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गेस्ट लेक्चरर म्हणून काम करणाऱ्याच्या लेक्चर्स देऊन मिळणाऱ्या कमाईवर देखील १८ टक्के वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी भरावा लागणार आहे. अॅडव्हान्स रुलिंग अथॉरिटी म्हणजेच एएआर च्या कर्नाटक खंडपीठाने असा निर्णय दिला आहे.
साईराम गोपालकृष्ण यांनी यासंदर्भात एएआरकडे अर्ज करून विचारले होते की, गेस्ट लेक्चरमधून म्हणजेच अतिथी व्याख्यानातून मिळणारे उत्पन्न करपात्र सेवेत येते का? यावर सुनावणी करताना
हा आदेश पारित करण्यात आला आहे.एएआरने म्हटले की,अशा सेवा इतर व्यावसायिक,टेक्निकल आणि व्यावसायिक सेवांच्या अंतर्गत येतात आणि सेवांच्या सूट मधील श्रेणीअंतर्गत नाहीत. त्यामुळे अशा सेवांवर १८ टक्के दराने जीएसटी भरावा लागेल. एएआरच्या आदेशाचा अर्थ असा आहे की,ज्या सेवा व्यावसायिकांचे उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना गेस्ट लेक्चर्सच्या कमाईवर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की,यामुळे लाखो फ्रीलांसर, शैक्षणिक, संशोधक, प्राध्यापक आणि इतरांसाठी अडचणी सुरु होतील उघडेल. हे
लोक ठराविक रक्कम घेऊन त्यांचे ज्ञान शेअर करतात.शिक्षक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून पार्ट टाईम काम करणार्या व्यक्तींना देखील या निर्णयानंतर जीएसटी भरण्याची त्यांची जबाबदारी पुन्हा व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे असे देखील मोहन पुढे म्हणाले.