संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

यापुढे समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्यास ५० हजारांचा दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

 गोवा सरकारचा नवा नियम

पणजी – मित्रांसोबत गोव्यात पर्यटनाची मजा लुटण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना यापुढे एका नियमाला सामोरे जावे लागणार आहे. आता गोव्यातील समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्यास तब्बल ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल.गोवा सरकारने हा नवा नियम लागु केल्याने पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोवा सरकारने समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छतेसाठी कठोर नियमांची घोषणा केली आहे.त्यानुसार,या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याा पर्यटकांना आर्थिक दंड ठोठावला जाईल.गोवा पोलिसांची समुद्र किनाऱ्यावर गस्त आणखी कडक करण्यात येणार आहे.३१ ऑक्टोबरपासून गोव्याचा समुद्र किनाऱ्यावर वाहन चालविणे आणि स्वयंपाक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यासाठी दोषी व्यक्तींवर कडक कारवाई गोवा पोलिस करणार आहे. त्यासाठी दक्षता पथकही असतील.एवढेच नाही तर एखादी व्यक्ती किनाऱ्यावर दारु पिताना आणि बाटल्या फोडताना आढळली, कचरा करताना सापडली.तर अशा व्यक्ती किंवा समूहावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर जबर दंड ठोठावण्यात येणार आहे.अर्थात हा नियम काही फक्त पर्यटकांना लागू असेल असेल नाही. तर समुद्र किनाऱ्यावर जेवण, दारुचा पुरवठा करणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर सेवा पुरवठादारांनाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे. वॉटर स्पोर्टस हा ठराविक ठिकाणी सुरु असेल.आता उघड्यावर तिकीट विक्री करता येणार नाही.त्यासाठी संबंधितांना तिकिट काऊंटर उघडावे लागतील.फेरीवाले,
हातगाडीवाले यांनी पर्यटकांना अडथळा ठरेल अशी वर्तुणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना आर्थिक दंड लावण्यात येईल.अशा व्यक्तींना, आयोजकांना ५ हजार ते ५० हजार अथवा नियमानुसार जे योग्य असेल ती रक्कम दंड म्हणून जमा करावी लागेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami