कॅलिफोर्निया – ट्विटर, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनंतर आता याहू कंपनीनेही कर्मचारी कपात धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याहूने २० टक्के कर्मचारी कमी करणार असल्याची घोषणा केली आहे.
याहूने सांगितले की, त्यांच्या जाहिरात तंत्रज्ञान विभागाच्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून एकूण कर्मचार्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आहे.कर्मचारी कपातीचा परिणाम ५० टक्के जाहिरात तंत्रज्ञान कर्मचार्यांवर होईल. या विभागातील १६०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसेल. यापूर्वी गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते की, कंपनीतील १२ टक्के म्हणजेच एक हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजेच ६०० लोकांना कामावरून काढून टाकणार आहे.