संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

‘या’ शेअरने 3 वर्षात दिला 800 टक्के रिटर्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शेअर बाजारात सध्या ‘एव्हरेस्ट कांटो’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. तीन वर्षात या समभागाने तब्बल 800 टक्क्यांची झेप घेतली आहे. 1 फेब्रुवारी 2019 रोजी एव्हरेस्ट कांटोच्या एका शेअरची किंमत केवळ 27 रुपये 55 पैसे इतकी होती, जी आज 255 वर पोहोचली आहे.

एव्हरेस्ट कांटो ही फॅब्रिकेटेड मेटलची उत्पादने बनवते. कंपनी सीमलेस गॅस सिलिंडर, इतर सिलिंडर, द्रवीभूत पेट्रोलियम गॅस आणि इतर वायूंसाठी उपकरणे तयार करते. कंपनीचा व्यवसाय भारत, चीन, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, हंगेरी आणि थायलंड या देशांमध्ये पसरलेला आहे.

एव्हरेस्ट कांटोचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या टप्प्यावर सरासरीच्या वर ट्रेडिंग करत आहे. एका वर्षाच्या कालावधीत या शेअरच्या किंमतीत तब्बल 354 टक्क्यांनी वाढ झाली असून 2022 मध्ये तो 12.7 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत हा शेअर 8 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई शेअर बाजारात इंट्राडे व्यवहारांमध्ये या शेअरने आज कालच्या भावात 3.5 टक्क्यांनी वाढ नोंदवली. कंपनीच्या व्यवसायात सातत्याने होत असलेली वाढ हे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच एखाद्या गुंतवणूकदाराने 1 फेब्रुवारी 2019 रोजी एव्हरेस्ट कांटोच्या शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती, तर तीन वर्षांत ती 9.25 लाख रुपये झाली असती, असेही तज्ज्ञ सांगतात.

डिसेंबर 2021च्या तिमाहीअखेर या कंपनीच्या 11 प्रवर्तकांकडे 67.39 टक्के हिस्सा किंवा 7.56 कोटी शेअर्स आहेत. तसेच 42 हजार 419 सार्वजनिक भागधारकांकडे 32.61 टक्के हिस्सा म्हणजे 3.65 कोटी शेअर्स आहेत. तर 21 परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडेही कंपनीचे 6.22 लाख शेअर्स किंवा 0.56 टक्के हिस्सा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami