संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद! भारतीयांना आणण्यासाठी गेलेले एअर इंडियाचे विमान अर्ध्यातूनच माघारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. यावेळी विमानतळ आणि लष्करी ठिकाणांना लक्ष केले जात असताना युक्रेनकडून सुरक्षेच्यादृष्टीने हवाई मार्ग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी काल सकाळी कीव येथे निघालेले एअर इंडियाचे विमान अर्ध्यातूनच परतले असल्याचे समजते.

दरम्यान, रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेनने आपले हवाई क्षेत्र सर्व व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद केले आहे. त्यामुळे सुमारे दोन तासांच्या उड्डाणानंतर हे विमान इराणच्या हद्दीत असताना, त्यांना युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद झाल्याची माहिती मिळाली. यानंतर एअर इंडियाचे विमान माघारी परतले. गुरुवारी सकाळी, रशियाने उत्तर-पूर्व युक्रेनवरील हवाई क्षेत्रामध्ये नागरी हवाई वाहतुकीवर बंदी घालणारी एअरमनला नोटीस जारी केली. यानंतर, युक्रेनने फ्लाइट्सच्या सुरक्षेला जास्त धोका असल्याने सकाळी ६.१५ वाजल्यापासून नागरी हवाई उड्डाणांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची नोटीस जारी केली. रशियाने नागरी उड्डाणांचे संरक्षण करण्यासाठी युक्रेनच्या सीमेवर असलेल्या रोस्तोव्ह सेक्टरमधील काही हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडियाचे या आठवड्यातील हे दुसरे विमान होते. एअर इंडियाच्या एआय -१९४७ विमानाने काल सकाळी ७.३० वाजता नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाला युक्रेनची हवाई सीमा बंद झाल्याची माहिती मिळाली आणि ते परतले. एअर इंडियाचे या आठवड्यात कीवला जाणारे दुसरे विमान होते. मंगळवारी एअर इंडियाने कीवमधून २४२ भारतीयांना परत आणले, ज्यात बहुतांश विद्यार्थी होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami