संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

युक्रेनमधील १५०० भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यास नकार देवू लागले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने देश सोडण्यास सांगितलेले आहे. परंतु येथील जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी भारतात माघारी परतण्यास नकार दिला आहे. भारत सरकारचा सल्ला मानण्यास हे विद्यार्थी तयार नाहीत.भारत सरकारने त्यांच्यासाठी पुढील शिक्षणासंबंधी काहीच पर्याय ठेवलेला नाही.त्यामुळे हे विद्यार्थी सरकारच्या भूमिकेवर नाराज आहेत. आम्हाला मरण आले तरी बेहत्तर पण आम्ही आता इथेच शिकणार,आमचे मृतदेह शव पेटीतून न्यावे लागले तरी ते आम्हाला मान्य आहे, कारण आमच्याकडे दुसरा काहीच विकल्प नाही.आधीच भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.त्यांना भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्यांचे भविष्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहिले आहे त्याचीच आम्ही आता वाट पाहतोय,असा निर्धारच युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या पण मायदेशी परतण्यास नकार देणार्‍या विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने एक ॲडव्हायजरी जारी केली होती.युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे संघर्ष वाढला आहे.सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने भारतीय नागरीकांनी युक्रेनमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला यातून देण्यात आलेला आहे. शिवाय युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांनी लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचे आवाहन या ॲडव्हायजरीच्या माध्यमातून करण्यात आले.युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये १ हजार ५०० भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami