कीव्ह – क्रीमिया पुलावरील हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनवर नव्याने पुन्हा जोरदार हल्ले सुरू केले. त्यांची तीव्रता अजूनही कायम आहे. युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने क्षेपणास्त्राचा हल्ला सुरूच ठेवला आहे. जगभरातून पुतीन यांच्यावर टीका होत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी हल्ले आणखी तीव्र केले. त्यामुळे कीव्ह, खारकिव आणि इतर काही शहरांचा वीज व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेथील नागरिकांना त्याचा सामना करावा लागत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात ९ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यानंतरही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा राग शांत झालेला नाही. क्रीमिया पुलावर झालेल्या हल्ल्यानंतर ते आणखी संतापले. त्यांनी आता हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवली आहे. कीव्ह, खारकिव व इतर शहरांवर ते क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. त्यामुळे या शहरांच्या पायाभूत सुविधा उध्वस्त झाल्या आहेत. सोमवारी युक्रेनवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे कीव्ह, खारकिव आणि इतर शहरांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे इतर व्यवहार बंद पडले आहेत. नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. या सर्व घटनांचा जागतिक स्तरावरून निषेध केला जात आहे. मात्र त्यानंतरही रशियाने हल्ले सुरुच ठेवले आहेत.