संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

युक्रेन दुतावासांकडून भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कीव्ह – रशियाने युक्रेनसोबत युद्ध पुकारल्यामुळे युक्रेनमधील भारतीय लोक भयभीत झाले आहेत. अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकल्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना भारतात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी यु्क्रेनमधील दुतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांनी मदतीसाठी काही दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत. या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधून मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सुचनेनुसार भारतीय नागरिक युक्रेनच्या पश्चिमेकडे स्थलांतर करू शकतात. मात्र, त्यांनी आपले पासपोर्ट आणि इतर कागदपत्र सोबत ठेवायची आहेत. युद्धामुळे हवाई मार्ग बंद करण्यात आल्याने इतर पर्यायी मार्गांचा विचार केला जात आहे. त्यामुळे अडचणीत असलेले नागरिकांना मदतीसाठी दुतावासाच्या वेबसाईट, सोशल मीडिया आणि दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे. मदतीसाठी नागरिकांना  +38 0997300428, +38 0997300483, +38 0933980327, +38 0635917881, +38 0935046170 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami