संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

युक्रेन-रशियात पुन्हा एकदा तणाव; रशियाचा क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरुच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – यूक्रेन आणि रशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. रशियाने क्षेपणास्त्रांसोबत युद्ध अभ्यास सुरु केल्याने युरोपीय देशांची चिंता वाढली आहे. जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणावामुळे जगभरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. यूक्रेन आणि रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी, अमेरीका, फ्रान्ससारख्या देशांकडून आपल्या नागरिकांना यूक्रेनने ताबडतोब सोडण्याचं आवाहन केले आहे. पुतीनने जागतिक विरोध डावलत क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याने एक प्रकारे अमेरिकेने रशियाला इशाराही दिलाय की, यूक्रेनवर हल्ला झाल्यास त्याला आम्ही देखील उत्तर देऊ असे म्हटले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रशियाने आपले सैन्य मागे घेतल्याचा दावा केला. मात्र हा सर्व बनाव असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर अमेरिकेने रशियाला यूक्रेनवर हल्ला न करण्याचा इशारा देखील दिला. मात्र रशियाने नाटोमुळे आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हणत युद्ध अभ्यास सुरुच ठेवला आहे. यूक्रेनच्या सीमेवर ४० टक्के रशियन सैन्य तैनात असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेलारूसमध्ये देखील रशियाचे सैन्य तैनात आहेत. त्यामुळे युरोपीय देशांना युद्ध होणार का? याची चिंता सतावते आहे.

फ्रान्स, ब्रिटनसारख्या देशांकडून युद्ध टाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पुतीन यांच्यासोबत बातचीत देखील करण्यात आली, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. यूक्रेनमधील रशियाच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या भागात स्फोट आणि गोळीबार सुरु आहेत. यात यूक्रेनचे दोन सैनिक ठार झालेत. भारतीय दूतावासाकडून काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक काढत गरज नसल्यास भारतीय विद्यार्थ्यांनी परत यावे असे आवाहन केले होते.

यूक्रेनमधील परिस्थिती बिघडत असल्याचं दिसताच भारताकडून देखील एअर इंडियाच्या तीन फ्लाईट्स भारताकडे २२,२४ आणि २६ फेब्रुवारी रोजी झेपावणार आहे. त्यामुळे यूक्रेन आणि रशियात संघर्ष होत युद्ध होणार का? याची टांगती तलवार जगावर असेल. रशिया जगातला तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे.

युरोपातल्या अनेक देशांना रशिया तेल पुरवतो.अशातच युरोपास युद्ध नकोय. अमेरीकेकडून देखील तेच प्रयत्न सुरु आहेत. मात्र, रशियाकडून वेगळेच चित्र समोर येत आहे. त्यामुळे या संघर्षामुळे किती बळी जातील आणि किती भयानक परिस्थिती असेल हे येणारा काळच ठरवेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami