संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

युजीसीचा नवा नियम! पदवी ३ ऐवजी ४ वर्षांनी मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पदवीसंदर्भात युजीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीए, बीएस्सी, बीकॉमची पदवी आता ३ ऐवजी ४ वर्षांनी मिळणार आहे. हा नवीन नियम २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. देशातील ४५ विद्यापीठे याची अंमलबजावणी करणार आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणात आतापर्यंत १२ वीनंतर ३ वर्षांत कोणत्याही शाखेची पदवी मिळत होती. परंतु आता युजीसीने नियमात बदल केला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून ३ ऐवजी ४ वर्षांनी पदवी मिळणार आहे. देशातील ४५ विद्यापीठांना हा नियम लागू होणार आहे. पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्यांना आता ४ वर्षांनी पदवी मिळेल. देशातील अनेक डिम्ड युनिव्हर्सिटीही हा नियम स्वीकारणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami