संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

युद्धकाळात पाकिस्तानचे पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियात पोहोचायला आणि रशियाने युक्रेनसोबत युद्धाची घोषणा करायला एकच वेळ झाली आहे. यामुळे विमानतळावर पोहोचताच खान यांनी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे , मी खूप योग्य वेळी आलो आहे. खूप उत्सूक आहे, अशा आशयाचे वक्तव्य केले होतं. या स्वागताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मॉस्को विमानतळावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं स्वागत तर झालं. पण रशियन अधिकाऱ्याने लागोलाग त्यांना कारमध्ये बसवलं आणि ‘आपण उद्या भेटू’ असा संदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाले आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रे रशियावर आक्रमण करण्याच्या पवित्र्यात असताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान रशियात जाऊन पोहोचले आहेत. अमेरिकेने खान यांच्या या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जबाबदार देश म्हणून रशियाच्या या पावलावर त्यांनी चिंता व्यक्त करावी असे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami