संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

युद्ध संपण्याच्या दिशेने, युक्रेन आणि रशिया चर्चेसाठी तयार; आज होणार शांती वार्ता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कीव – गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू असून या संघर्षात एक सकारात्मक घटना घडली आहे. या दोन्ही देशांनीही चर्चा करण्यास संमती दर्शवली असून बेलारुसमध्ये ही चर्चा होणार आहे. बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली असून आता या दोन्ही देशांतील संघर्ष संपणार का हे पाहण्यासाठी संपूर्ण जगाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

२४ फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हचा ताबा घ्यायचा आहे. त्यामुळे रशियन लष्कराने तिन्ही बाजुंनी चढाई करत मिसाईल डागल्या. दरम्यान, बॉम्ब हल्लाही करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये अशांतता असल्याने जगभरातील नागरिक धास्तावले आहे. मात्र, आता या दोन्ही देशांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी युक्रेनच्या सरकारला आमंत्रित केलं होतं. मात्र, युक्रेनने बेलारुसमध्ये चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. अखेर युक्रेनने रशियाचा प्रस्ताव स्वीकारला असून, आज दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये शांती वार्ता होणार आहे. त्यामुळे उभय देशांतील लष्करी संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून शांती वार्ता बैठकीची माहिती देण्यात आली. बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक फोटो ट्विट केला. ज्यात दोन्ही देशातील चर्चेसाठी तयार करण्यात आलेला टेबल दिसत आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील बैठकीसाठीची तयारी झाली आहे. आता फक्त दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची प्रतिक्षा आहे, असं बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असली, तरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की हे फार आशावादी नसल्याचं दिसत आहे. बैठकीच्या चर्चा सुरू असताना आणि युक्रेनचं शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना होण्यापूर्वी झेलेन्स्की म्हणाले, “नेहमीप्रमाणेच या बैठकीतून काही परिणामकारक घडेल अशी आशा नाही, प्रयत्न करू देऊयात,” असं त्यांनी म्हटलं आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami