संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

युनिसच्या वादळातही यशस्वी लॅण्डिंग; भारतीय वैमानिक कॅप्टन भारद्वाज आणि राव यांचे कौतुक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – ब्रिटन सध्या गेल्या ३२ वर्षांतील सर्वात मोठ्या धोकादायक वादळाचा सामना करत आहे. युनिस वादळ ब्रिटनमध्ये जेव्हापासून आले आहे, तेव्हापासून सगळीकडे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. या वादळामुळे विमान, रेल्वे आणि सागरी सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर अनेक विमानाचे मार्ग वळवण्यात आली आहेत. अशावेळी प्रचंड वादळातही लंडनमधील हिथ्रो विमानतळावर विमानांचे लँडिंग करणेही कठीण झाले असतानां, भारतीय पायलट यांच्याकडून सुरक्षित लँडिंग करण्यात आले. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जगभरात भारतीय वैमानिकांच्या कौतुक होत आहे.

दरम्यान, जोरदार वाऱ्यामुळे येथे अनेक विमानेही अडकून पडली आहेत. पण या आव्हानात्मक परिस्थितीत वैमानिक कॅप्टन अंचित भारद्वाज आणि आदित्य राव यांनी विमानाचे नेतृत्व केले होते. शुक्रवारी वादळाचा प्रचंड जोर असतानाही यावेळी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर बोईंग ड्रीमलायनर विमानाचे सुरक्षित लँडिंग केले.

‘बिग जेट टीव्ही’ या यूट्यूब चॅनलद्वारे विमानाचे सुरक्षित लँडिंग थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. प्रचंड वादळातही भारतातून एक नव्हे तर दोन विमानांनी हिथ्रो विमानतळावर यशस्वी लँडिंग केले. प्रतिकूल परिस्थितीत ज्या फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले त्यापैकी एक ए/१४७ हे हैदराबादहून आलेले आणि दुसरे गोव्याहून आलेले ए/१४५ उड्डाण होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय वैमानिकांच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

दरम्यान, ब्रिटिश सरकारने सर्वांना घरातच सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला असतानां, हवामान खात्याच्या मते, ‘युनिस’ वादळ हे सर्वात धोकादायक वादळ असल्याचे घोषित करण्यात आले असतानां, शुक्रवारी ताशी १९६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी ब्रिटनला हादरवले. मात्र भारतीय पायलटने या धोकादायक वादळात एअर इंडियाच्या विमानाने केलेलय नेत्रदीपक यशस्वी लँडिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यसामुळे त्या पायलटचे मोठे कौतुक केले जात आहे. इतर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली त्यामुळे या जिगरबाज वैमानिकाने कमाल केली असल्याचे तसेच हा अत्यंत कुशल भारतीय वैमानिक असल्याचेही बोलले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami