लखनौ – युपी मधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतून मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने माघार घेतली आहे. त्यामुळे बसपाच्या या माघारीचा आता समाजवादी पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे . तसेच आजम खान यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रामपूर विधानसभा मतदार संघातही पोटनिवडणूक होत आहे . मैनपुरी आणि रामपूर हे दोन्ही समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले आहेत .
मैनपुरी मुलायमसिंग मधून दिवंगत मुलायमसिंग यादव यांची सून डिंपल यादव हिला सापाने उमेदवारी दिली आहे तिच्या विरोधात भाजपने रघुराज शक्य याना तिकीट दिले आहे . तर रामपूर विधानसभा मतदार संघात समाजवादी पक्षाने असीम राजा याना तिकीट दिले आहे तर त्यांच्या विरोधात आकाश सक्सेना निवडणूक लढवीत आहेत. मात्र या मतदार संघातील यादव आणि दलित मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्याने तसेच बसपाने निवडणुकीतून माघार घेतलेली असल्याने सापाचे दोन्ही उमेदवार निवडून येतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. . अर्थात बसपाने तटस्थ भूमिका घेतलेली असल्याने बसपाच्या दलित मतदारांचा सपाला खरोखरच फायदा होईल कि नाही हे सांगता येणार नाही . पण सपाच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग मात्र सोपा झाला आहे.