संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

युपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५९.२४ टक्के मतदान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज ५८ जागांसाठी ५९.२४ टक्के मतदान झाले. यात योगी मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांसह भाजपा, समाजवादी पार्टी, बसपा आणि कॉंग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांसह ६२३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे.

उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. यापैकी आज पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशच्या ११ जिल्ह्यातील ५८ जागांसाठीचे मतदान पार पडले हा संपूर्ण पट्टा भाजपचा गड, म्हणून ओळखला जातो मागच्या वेळेस भाजपने येथूनच जवळपास ५० जागा जिंकल्या होत्या आजच्या निवडणुकीत इतेहाबाद , दक्षिण आग्रा, बाह, छाता, मथुरा सर्धना, मेरठ शहर, छाप्रोली बदौत, बागपत आणि कैरोना या मतदार संघातील ५५३५पोलिंग सेंटर संवेदनशील असल्याने सुरक्षा दलाच्या तब्बल ८०० कंपन्या सर्व मतदानकेंद्र परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या . सकाळी मतदानाचा वेग कमी असला तरी दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला आणि मतदान संपेपर्यंत ६३ टक्के इतके मतदान झाले.

गाझियाबाद जिल्ह्यातील सहा मतदार संघापैकी लोणी मध्ये ५७.६० टक्के,मुराद्नगर मध्ये ५७.३० टक्के,साहिबाबाद मध्ये ४५ टक्के, गाझियाबाद ५०.४० टक्के, मोडी नगर ६३ .५३ टक्के, तर धौलनात ५८ टक्के मतदान झालेगौतम बुध नगर मध्ये नोएडा ४८ टक्के,दादरी ५६ टक्के,तर जेवर्मध्ये ६०.३ टक्के मतदान झाले बुलान्द्शाहर ६०.५२,आग्रा ५६.६१,अलीगड ५७.२५, बागपत ६१.३५,गज़ियबद५४.७७ ,हपुड ६०.५० मथुरा ५८.५१,मेरठ ५८.५२. मुझ्झापूर नगर ६२.१४ ,शमली ६१.७८ ,खैर ५७.८ बरोली ५९.६८, अत्रोली जिथून जिथून दिवंगत भाजपा नेते कल्तूयाण सिंग यांचा नातू संदीप सिंग निवडणूक लढवीत आहेतिथे ५७.२ टक्मके मतदान झाले.अशा तर्हेने पहिल्या टप्प्यात ५९.२४ अशी मतदानाची टक्केवारी आहे.

आग्रा येथील बाह विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रावर एक बोगस मतदाराल पकडण्यात आले हा भाजपचा मतदार असल्याचा आरोप सपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मेरठ मध्ये ११० वर्षाच्या आजीने आपल्या नातीसह मतदान केंद्रावर जावून मतदान केले. तर दुसरीकडे मतदानाची वेळ संपल्यामुळे समाजवादी आर एल डी आघाडीचे नेते जयंत चौधरी यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही .तर दुसरीकडे एत्माद्पूर मतदार संघातील आवल्खेडा बुथवर मतदानाचा व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर टाकणाऱ्या अजय कुमार नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला अटक करण्यात आली पहिल्या टप्प्यात काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami