पणजी:- क्रिकेटपटू युवराज सिंग यांने गोव्यात अलिशान घर आहे. गोव्यातील मोरजी येथील निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आले आहे. मात्र युवराजच्या या व्हिलाला पर्यटन खात्याने नोटिस बजावली आहे. नोंदणी न करताच व्हिल्लाचा व्यावसायिक वापर त्याने चालू केला होता. सदर व्हिल्ला ‘होम स्टे’ म्हणून वापरण्यात येत असून येथे पर्यटकांना खोल्या भाड्याने दिल्या जात आहेत. पर्यटन विभागाने कारवाई केल्यास लाखो रुपयांचा दंड त्याला भरावा लागेल.
मोरजिममधील व्हिला नोंदणी न करता ‘होमस्टे’ म्हणून चालवल्यामुळे पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये त्याला 8 डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. गोवा पर्यटन व्यापार अधिनियम 1982च्या अंतर्गत राज्यात ‘होमस्टे’चे संचालन नोंदणी केल्यानंतरच केले जाऊ शकते. युवराजला भरावा लागू शकतो दंड राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी 18 नोव्हेंबर रोजी उत्तर गोव्यातील मोरजिम येथील युवराज सिंग याच्या मालकीच्या व्हिला ‘कासा सिंग’ या पत्त्यावर नोटीस बजावली. त्यात त्यांनी युवराजला 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथे वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.