संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

येरवडा कारागृहात दोन कैद्यांच्या गटामध्ये तुफान दगडफेक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पोलीस हवालदारालाही फरशी, दगडाच्या तुकड्यानी मारहाण

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुने कैदी आणि नवीन कैद्यांमध्ये ही दगडफेक झाली आहे. दगडफेक सुरू असताना, अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला सुद्धा कैद्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत हवालदार जखमी झाले आहे. हनुमंत मोरे असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बराक नंबर २७ ते ३१ या बराक जवळ कैद्यांचे दोन गट आमने सामने आले. न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी तरंग राकेश परदेशी, बंदी निलेश श्रीकांत गायकवाड, बंदी पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि बंदी देवा नानासो जाधव या पाच कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर कैद्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. घटना समजताच पोलिस हवालदार हनुमंत श्रीमंत मोरे हे भांडण सोडवण्यास गेल्यावर, त्या पाच कैद्यांनी हनुमंत श्रीमंत मोरे यांना फरशीचे तुकडे आणि दगडांनी मारहाण केली आहे. या घटनेत हनुमंत श्रीमंत मोरे जखमी झाले आहेत. त्यांना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारागृहात राडा करणाऱ्या या पाच कैद्यांवर देखील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कारागृहात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास येरवडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami