संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

योगींच्या काळात युपी कर्जबाजारी; ६ लाख ९१ हजार कोटींचे कर्ज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ – योगी सरकारच्या काळात उत्तर प्रदेश कर्जबाजारी झाला असून सध्या युपीवर ६ लाख ९१ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यातील ४० टक्के कर्ज योगी सरकारच्या काळातील आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री चदंबरम यांनी केला आहे.

चिदंबरम यांनी आज आकडेवारीसह योगी सरकारवर निष्ण साधला आहे. त्यांनी सांगितले की २०१८ पासून युपीत दर ४ व्यक्तींपैकी एक व्यक्ती बेरोजगार असून या राज्यातील लाखो युवक नोकरीसाठी उत्तर प्रदेश सोडून दुसऱ्या राज्यात जात आहेत. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचा जीडीपी ११.४ टक्के इतका होता. तो आता उणे ६.४ टक्के इतका झाला आहे. या राज्यातील दरडोई उत्पन एकूण राष्ट्रीय दरडोई उत्पनाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. योगी सरकारच्या काळात राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न २ टक्क्यांनी घटले आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार या राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या ३७.९ टक्के इतकी झालीय. उत्तर प्रदेशातील १२ जिल्ह्यातील हा आकडा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दारिद्र्याची ही भीषण स्थिती आहे. या राज्यातून ८ पंतप्रधान देशाला लाभले, मात्र तरीही हे राज्य गरीब राहिले. ही दुःखद बाब आहे, असेही चिदंबरम यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाकडे योगी सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून त्यामुळेच लोकांची स्थिती भयानक आहे. त्यांना चांगले भविष्य नाही. ज्या राज्यात शिक्षकांच्या २ लाख ७७ हजार जागा रिक्त आहेत. त्या राज्यातील शिक्षणाची स्थिती काय असेल याची कल्पनाही करवत नाही असेही शेवटी चिदंबरम यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami