संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

रक्तातील साखरेच्या पातळीवर वेळीच नियंत्रण ठेवा; डॉक्टरांचा इशारा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे हृदयाशी संबंधित आजार, दृष्टी कमी होणं, मूत्रपिंडाचे विकार, किडनी स्ट्रोन, अंधत्व आणि अन्य दीर्घकालीन आजार होण्याचा धोका अधिक असतो. हे टाळण्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी नियमितपणे रक्तातील साखरेची मात्रा तपासून पाहणे आवश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

सीआय कम्बाला हिल हॉस्पीटल येथील जनरल फिजीशियन मनीष मावाणी म्हणाले की, “साखरेची पातळी कमी होण्याची चिन्हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये थरथरणे, घाम येणे, अस्वस्थता किंवा चिंता, चिडचिड किंवा गोंधळ, चक्कर येणे आणि अगदी तीव्र भूक याचा समावेश आहे. साखरेची पातळी कमी होणे हे धोकादायक ठरु शकते. कारण रक्तातील साखरेची पातळी जास्त किंवा कमी असणे गॅस्ट्रोपेरेसिस नावाच्या स्थितीस आमंत्रण देऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे पोट रिकामे होण्यासाठी उत्तेजित करणार्‍या वॅगस मज्जातंतूच्या सिग्नलिंगवर परिणाम होतो. गॅस्ट्रोपॅरेसिसमुळे पचनसंस्थेमध्ये समस्या निर्माण होतात. कारण त्यामुळे अन्न लहान आतड्यात पोहोचण्यापूर्वी पोटात जास्त वेळ घालवू शकतो. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये विविध समस्या निर्माण होतात. अशक्तपणा, डोके दुखणे आणि चक्कर येणे ही सुरुवातीची लक्षणे आहेत. याशिवाय, कमी ग्लुकोजमुळे डोकेदुखीचा त्रास होतो, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल. शिवाय, अंधुक दृष्टी, डोकेदुखी आणि गोंधळ होईल. उपचार न केल्यास, रक्तातील साखरेची पातळी गंभीरपणे कमी होणे जीवघेणे ठरू शकते आणि त्यामुळे फेफरे येणे, चेतना नष्ट होणे किंवा मृत्यू होऊ शकतो.”

साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी नियमित व्यायाम करणं अतिशय फायदेशीर आहे. कारण यामुळे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. व्यायामामुळे स्नायूंना ऊर्जेसाठी आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी रक्तातील साखर वापरता येते. सायकल चालवणे, चालणे, जॉगिंग, पोहणे, एरोबिक्स, वेट ट्रेनिंग, योगा आणि पायलेट्स यांसारख्या विविध क्रियाकलापांचा प्रयत्न करा. कार्बोहायड्रेटच्या सेवनाचे निरीक्षण करा. नियमित आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करा. नूडल्स, ब्रेड, पास्ता यासारख्या पदार्थांचे सेवन टाळा आणि भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य आहारात समावेश करा. धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन करणं शक्यतो टाळावेत. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. मूत्राद्वारे साखर काढून टाकण्यासाठी पाणी मूत्रपिंडांना मदत करते. साखरेचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यासाठी बार्ली, दही, ओट्स, बीन्स, मसूर आणि शेंगांचे सेवन करा.

मधुमेह हा सायलंट किलर आहे. साखर किंवा ग्लुकोज आपल्या शरीरात उर्जा निर्माण करण्याचा मुख्य स्रोत आहे. ही साखर रक्ताच्या माध्यमातून आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत पोचते म्हणजे रक्तातील साखर आपल्या शरीराची मुलभूत गरज आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे जसे धोक्‍याचे असते तितकेच तिचे रक्तातील प्रमाण कमी होणेही धोक्‍याचे असते. रक्तातील साखर कमी होण्याच्या स्थितीला हायपोग्लयसेमिया असे म्हणतात, असे झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. मंजिरी कार्लेकर यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami