नवी दिल्ली – अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी त्यांचातील १८ वर्षांचे नाते संपवत ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. च्या घटस्फोटाच्या चर्चेला पुर्णविराम मिळला असून, ऐश्वार्या रजनीकांत हिला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान, घटस्फोटांनंतर तिचा कोविड-१९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहीती ऐश्वर्याने सोशल मिडियावर दिली असून, कोरोनाच्या नियमांचे, अटींचे पालन करुनही मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यावर सध्या रुग्णालयात उपचार असून, सर्वांनी मास्क परिधान करणे गरजेचे आहे. याशिवाय लसीकरण करणे अनिवार्य असल्याचे तिने म्हटले आहे. २०२२ मध्येही कोरोना आला आहे. त्यामुळे सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे, अशा आशयाचे कॅप्शन लिहित ऐश्वर्याने फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तिच्या हाताला आयव्ही लावली असल्याचे दिसते आहे. ऐश्वर्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या यांनी १८ वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एक सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर दोघांनीही ही माहिती दिली. धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्षांमध्ये केवळ एकाच चित्रपटात काम केले आहे.