मुंबई – आपली लक्झरी लाइफ जगणारा रणवीर सिंग सर्वांनाच माहित आहे. तो नेहमीच स्टायलिश आणि व्हायब्रंट लूकमध्ये दिसतो. रणवीर सिंग सध्या सतत चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या खुलाशांमुळे ‘कॉफी विथ करण सीझन-७’वर त्याने वर्चस्व गाजवले. एकूणच तो त्याच्या व्यवसायिक कामामुळे चर्चेत होता. आता तर त्याने कोट्यवधी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आता लवकरच अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खानचे शेजारी होणार आहेत. रणवीर सिंगने सागर रेशम रेजिडेंशियल टॉवरमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. या अर्पाटमेंटचे बांधकाम अजून पूर्ण झालेल्या नाही. मात्र त्यांनी ज्या अपार्टमेंटची बोलणी केली आहे, तिथून अरबी समुद्राचे सुंदर दृष्य पाहता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने हे घर ११९ कोटींना खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट शाहरुख खानचा मन्नत आणि सलमान खानच्या गॅलेक्सीच्या मध्यावर आहे. ते टॉवरच्या १६, १७, १८ आणि १९व्या मजल्यावर असणार आहे. यामध्ये एकूण ११,२९९ वर्ग फूटचा एरिया आणि १,३०० वर्ग फूटाचे टेरेस असणार आहे. तसेच इथे पार्किंगसुद्धा असेल.