संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

रतन टाटा पीएम-केअर्स फंडाच्या विश्वस्तपदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांच्याकडे मोदी सरकारने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. रतन टाटांची नियुक्ती पीएम केअर्स फंडचे नवे विश्वस्त म्हणून करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी.थॉमस आणि लोकसभेचे माजी सभापती करिया मुंडा यांच्याकडेही पीएम केअर्स फंडचे विश्वस्तपद देण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबद्दलची माहिती दिली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करून या निर्णयाला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पीएम केअर फंडच्या विश्वस्त मंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होते. हे दोघेही पीएम केअर फंडचे विश्वस्त आहेत. या बैठकीत निधीचे नवे विश्वस्त म्हणून रतन टाटा, केटी थॉमस आणि कारिया मुंडा यांना पीएम केअर्स फंडचे विश्वस्त म्हणून नेमण्याचा निर्णय झाला.

पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, ट्रस्टच्या सदस्यांनी एकत्रितपणे पीएम केअर्स फंडाच्या सल्लागार मंडळाची स्थापना करण्यासाठी इतरही प्रतिष्ठित व्यक्तींची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये भारताचे माजी कॅग राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडिया कॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami