संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

रत्नागिरीजवळ समुद्रात बुडणाऱ्या जहाजावरील १९ जणांना वाचवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – संयुक्त अरब अमिरातीच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात असलेल्या जहाजात पाणी शिरले. त्यामुळे ते बुडत होते. मात्र या जहाजातून मदतीच्या मागणीचा संदेश येताच सागरी बचाव पथक आणि भारतीय तटरक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जहाजावरील १९ जणांना वाचवले. त्यात १८ भारतीय व एका इथोपियन नागरिकाचा समावेश आहे. ही घटना रत्नागिरीजवळच्या समुद्रात ४१ मैल आत घडली.
एमटी पार्थ हे तेलवाहू जहाज दुबई येथून न्यू मेंगलोरकडे जात होते. ते देवगड-विजयदुर्ग दरम्यान खोल समुद्रात आले तेव्हा जहाजाला भोक पडले. त्यामुळे जहाजात पाणी भरण्यास सुरुवात झाली. तेव्हा जहाजावरील कर्मचाऱ्यांनी मदतीची मागणी केली. त्यांचा हा संदेश तेथे गस्त घालत असलेल्या सुजित आणि अपूर्वा या तटरक्षक दलाच्या दोन जहाजांना मिळाला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या जहाजावरील १९ जणांची सुखरूप सुटका केली. रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून पश्चिमेला समुद्रात सुमारे ४१ मैलावर ही घटना घडली, अशी माहिती तटरक्षक दलाने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami