संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

रत्नागिरी रिफायनरीसाठी
गोवळ गावी सर्व्हेक्षण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील गोवळ गावी आज अचानक पाच जण आले आणि त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने या भागाचे सर्व्हेक्षण सुरू केले. हे सर्व्हेक्षण रिफायनरीसाठी होत असल्याचे कळताच गावकरी गोळा झाले आणि त्यांनी सर्व्हेक्षण बंद पाडले.
रत्नागिरी रिफायनरीसाठी याआधीही दुसर्‍या गावात अशाच तर्‍हेने अचानक काही जणांनी सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता. आज दुसर्‍यांदा अशी घटना घडली. गोवळ गावात आलेल्या पाच जणांपैकी तिघेजण दिल्लीहून आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरी उभारायची असा निश्‍चय केंद्र सरकारने केला आहे. भाजपाची त्यांना साथ आहे. मात्र स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तरीही हा विरोध मोडून काढण्याचे प्रयत्न सतत
सुरू असतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami