संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

रविवारपासून बास्केटबॉल नॅशनल लीग कोचीमध्ये पाच दिवसांची पहिली फेरी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*बीएफआयने आयोजित केलेली पहिलीच नॅशनल लीग स्पर्धा

मुंबई- बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच बीएफआयने पहिल्यांदाच बास्केटबॉल नॅशनल लीग स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेची पहिली पाच दिवसांची फेरी कोची येथे १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये सहा बलाढ्य संघ आपले नशीब अजमावणार आहेत.संपूर्ण बास्केटबॉल नॅशनल लीग ही आयएनबीएल सीझन २०२२ अंतर्गत कोची,जयपूर,पुणे आणि बंगळूरू येथे होणार आहे.
या बास्केटबॉल नॅशनल लीग खेळणाऱ्या सहा संघांची नावे दिल्ली ड्रीबलर्स, चंडीगड वारीअर्स,चेन्नई हिट,बंगळूरू किंग्स,कोची टायगर्स आणि मुंबई टायटन अशी आहेत.पहिली फेरी १६ ते १० दरम्यान कोची येथे पार पडल्यानंतर दुसरी फेरी जयपूर येथे २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान होईल. तिसरी फेरी डिसेंबर महिन्यात ७ ते ११ तारखेदरम्यान महाराष्ट्रातील पुणे येथे होणार आहे.तसेच अंतिम विजयासाठी फेरी ११ ते १५ जानेवारीदरम्यान बंगळूरू येथे आयोजित करण्यात आली आहे.पाच दिवसांच्या फेरीतील सहा संघ राउंड रॉबिनमध्ये उर्वरित संघांविरुद्ध एकदा खेळतील. विजेते सामन्यासाठी संघाची निवड क्रमवारीच्या आधारे केली जाणार असून तीन फेऱ्यांमधील स्थाने अंतिम क्रमवारीत जमा होतील. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहाही संघाच्या लोगोचे अनावरण नुकतेच मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे करण्यात आले.
यावेळी बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासह अरविंद अरुमुगम (बंगळूरू किंग्स),एम.अरविंद कुमार (चेन्नई हिट),अरविंद सिंग कहलोन(चंडीगड वारीअर्स),दिग्विजय सिंग (दिल्ली ड्रीबलर्स), सेजीन मथ्यू (कोची टायगर्स )आणि सिद्धांत शिंदे (मुंबई टायटन) संघांचे प्रतिनिधित्व केले.त्याचप्रमाणे याप्रसंगी बीएफआयचे अध्यक्ष डॉ.के.गोविंदराज,सेक्रेटरी जनरल चंदर मुखी शर्मा यांनी भारतीय बास्केट बॉलला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami