अमरावती – शाई फेक प्रकरणात रवी यांना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे रवी राणा हे राज्याबाहेर होते. त्यांनी दिल्ली न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळविला. आज नागपूर येथील विमानतळावर ते उतरले. त्यानंतर अमरावतीकडे रवाना झाले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतानाच त्यांना भोवळ आली. राणा यांच्यावर रेडियंट रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिथं डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, आमदार राणा आज दिल्लीहून नागपूर विमानतळावर आले. त्यानंतर ते थेट अमरावतीला पोहोचले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आमदार त्यांचे स्वागत केले. यावेळी रवी राणा म्हणाले की, मी दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करतात, ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे. ज्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे राणा यांनी यावेळी सांगितले. तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यांचा १२०० कोटी रुपयांचा घोटाळा लवकरच उघडकीस येणार असून ईडी त्याचा तपास करत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांच्यासारख्या मंत्र्यांचे घोटाळेदेखील लवकरच समोर येतील, असे आमदार राणा म्हणाले.