संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

रशियाच्या ५० जवानांचा मृत्यू, सहा विमाने पाडली; युक्रेनचा दावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

किव्ह – युक्रेनसोबत झालेल्या वादाचे रुपांतर आता युद्धात झाले असून रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून सातजण जखमी आहेत. तसेच, रशियाच्या ५० जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.शिवाय, युक्रेनने आतापर्यंत रशियाचे सहा विमाने पाडल्याचाही दावा केला. मात्र, हा दावा रशियाकडून फेटाळण्यात आला आहे.

युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपलामध्ये पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

युक्रेनच्या लष्कराने Shchastya प्रांत आपल्या ताब्यात आला असून रशियाच्या ५० लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच रशियाचं आणखी एक विमान पाडल्याचंही सांगितलं आहे. म्हणजे आतापर्यंत रशियाची सहा विमानं पाडण्यात युक्रेनला यश आलं आहे.

तर, रशियाने युक्रेनची राजधानी कीववरदेखील हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

बँकामधून पैसे काढण्यास निर्बंध

युक्रेन बँकेकडून ग्राहकांवर नवे निर्बंध लादण्यात आले आहेत. युक्रेन सेंट्रल बँकेचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दिवसाला आता केवळ १ लाख हरिनिया (युक्रेनियन चलन) इतकेच पैसे काढता येतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami