संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

रशियातील तलावात आढळला
४८ हजार वर्षे जुना झोम्बी व्हायरस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को- नुकतेच कोरोना सारखे संकट दूर होत असताना आता आणखी एक नवा व्हायरस समोर आला आहे. शास्त्रज्ञांना तब्बल ४८ हजार वर्षे जुना झोम्बी व्हायरस रशियातील एका तलावात आढळून आला असून तो खूपच धोकादायक आहे.
कोरोनाहून अतिशय भयंकर असलेल्या झोम्बी व्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हायरस रशियातील एका तलावात आढळला असून ही जगभरासाठी एक धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जात आहे. झॉम्बी व्हायरसचा धोका इतका आहे की, तो लहान-लहान पेशी असलेल्या जीवांना सुद्धा संक्रमित करू शकतो.कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगभरात बसला.या महामारीनंतर आता साथीचे आजार पसरवणाऱ्या विषाणूंचा शोध घेण्यात येत आहे. भारतासारखे देश अशा प्रकारच्या व्हायरसचा सामना करण्यास सक्षम आहेत.मात्र, झोम्बी व्हायरसचा धोका नेमका किती आहे हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु अशा व्हायरस किंवा साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्टेजवर तयार राहणे आवश्यक आहे.
दरम्यान ,२०१८ मध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या काही भागांमध्ये हरणांमध्ये क्रोनिक वेस्टिंग डिसीज पसरला होता. या आजाराला झोम्बी डियर डिजीज देखील म्हटले जाते. हा आजार अमेरिकेच्या २२ राज्यात आणि कॅनडाच्या २ राज्यातील हरणांमध्ये पसरला होता.तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस हरणांचा मेंदू,पाठीचा कणा आणि अनेक पेशींवर हल्ला करते.तसेच यामुळे प्राण्यांचे वजन अचानक कमी होते. मानसिक संतुलन बिघडते. ते खूप चिडतात आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो. मनुष्याला या व्हायरसची लागण केवळ प्राण्याचे मांस खाल्ल्याने नाही तर त्यांची लघवी,लाळ,थुंकी यांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो.मनुष्याला या व्हायरसची लागण झाल्यास डायरिया,डिप्रेशन आणि लकवा मारल्याची लक्षणे दिसू शकतात.अद्याप सुर्दैवाने मनुष्यांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami