संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

रशियातील शाळेत गोळीबार ६ ठार! २०जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को: मध्य रशियामधील इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी झालेल्या गोळीबारात पाच मुलांसह नऊ जण ठार झाले आहेत. तर २० जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.रशियाच्या गृहमंत्र्यांनी स्वतःच या संदर्भात माहिती दिली आहे. या बातमीमुळे युक्रेन युद्धादरम्यान, खळबळ माजली आहे. या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षक, दोन शिक्षक, तसेच पाच अल्पवयीन मुलांसह नऊ लोकांचा मृत्यू झाला,” असे रशियन तपास समितीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्याचबरोबर रशियातील तास या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्लेखोराने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. तसेच त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.उदमुर्तिया प्रदेशात मॉस्कोपासून ९६० किलोमीटर पूर्वेला इझेव्हस्क येथील शाळा क्रमांक ८८ मध्ये ही घटना घडली असल्याची माहित उदमुर्तियाचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रेचलोव्ह यांनी एका व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये सांगितले. तर हल्ल्लेखोराबद्दल इतर कोणतेही तपशील किंवा माहिती मिळालेली नाही.राज्यपाल म्हणाले की, शाळेत इयत्ता १ ते ११ पर्यंतच्या मुलांना शिकवले जाते. सध्या शाळा बंद करण्यात आली असून, नाकेबंदी करण्यात आली आहे. ही शाळा इझेव्हस्कच्या मध्यभागी आहे, सुमारे ६५०,००० रहिवासी असलेले शहर, केंद्र सरकारच्या इमारतींच्या जवळ आहे. पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यातील संशयिताला पकडण्यासाठी तपास यंत्रणा कमला लागली आहे. विशेष म्हणजे क्लासेस सुरु असतानाच ही फायरिंग सुरु झाली. शाळा प्रशासनाने सांगितले की विद्यार्थी आणि शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami