संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

रशियातून आलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने दिल्लीत खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रशियाची राजधानी मॉस्को येथून येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती देणारा ई-मेल दिल्ली पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर आज शुक्रवारी पहाटे एकच धावपळ उडाली. पहाटे साडेतीन वाजता हे विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरविण्यात आले आणि प्रवाशांची सुटका करण्यात आली. विमानात ३८६ प्रवासी तसेच १८ विमान कर्मचारी होते. तपासणीअंती बॉम्बची केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले. एरोफ्लॉट फ्लाइट एसयू- २३२ असे या रशियन एअरलाइनच्या विमानाचे नाव आहे.
दिल्ली पोलिसांना रात्री सव्वा अकरा वाजता मॉस्कोहून येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देऊन सज्ज राहण्यास सांगण्यात आले. विमानतळावर बॉम्बरोधक तसेच मदत पथके तैनात करण्यात आली. २९ क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरविण्यात आल्यानंतर सर्व प्रवासी आणि वैमानिकांसह इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले.
विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली, मात्र त्यात कुठेही बॉम्ब आढळला नाही. बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा ई-मेल कोणी आणि कोठून पाठविला, याचा तपास पोलिस करीत आहेत. काल रात्री मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता.त्यानंतर पहाटे ३.२० च्या सुमारास विमान दिल्लीत उतरले.सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानातून उतरवण्यात आले. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami